Home शैक्षणिक अब्दुलखालिक फॉउंडेशने तरुनांसाठी विकास भारत यंग लीडर्स डायलॉग (VBYLD-2026) जागरूकता कार्यक्रम आयोजित...

अब्दुलखालिक फॉउंडेशने तरुनांसाठी विकास भारत यंग लीडर्स डायलॉग (VBYLD-2026) जागरूकता कार्यक्रम आयोजित केला

4
Abdulkhalik Foundation organizes Vikas Bharat Young Leaders Dialogue (VBYLD-2026) awareness program for youth

(शहादा)
अब्दुलखालिक एज्युकेशन अ‍ॅन्ड वेल्फेअर फाउंडेशनने भारत सरकारच्या क्रीडा व युवा मंत्रालयांतर्गत मेरा युवा भारत (MY भारत) यांच्या सहकार्याने विक्सित भारत यंग लीडर्स डायलॉग (VBYLD-2026) या विषयावर जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन सिटी हाय स्कूल, शहादा येथे करण्यात आले.
केंद्र सरकार आयोजित हा राष्ट्रीय युवा उत्सव (NYF), जो 1995 पासून दरवर्षी स्वामी विवेकानंद जयंती (12 जानेवारी) रोजी साजरा केला जातो, वर्ष 2025 पासून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या विक्सित भारत @2047 विजन अंतर्गत VBYLD या नव्या रूपात साजरा होऊ लागला आहे. येणारा 29 वा राष्ट्रीय युवा उत्सव – VBYLD-2026 जानेवारी 2026 मध्ये नवी दिल्ली येथे होणार असून, त्यासाठी जिल्हा स्तरावरील स्पर्धा 1 सप्टेंबर 2025 पासून व राज्य स्तरावरील स्पर्धा नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात होणार आहेत.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या चार मुख्य ट्रॅक्सची माहिती देण्यात आली –

  1. Cultural and Innovation
  2. Viksit Bharat Challenge
  3. Design for Bharat
  4. Hack for Social Cause
    याशिवाय Viksit Bharat Quiz संदर्भातही मार्गदर्शन करण्यात आले. ही क्विझ विद्यार्थ्यांना विक्सित भारताच्या संकल्पना, राष्ट्रीय विषय व समाजातील सकारात्मक बदलांबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. यात यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता दाखवता येणार आहे.
    या प्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक खलीक जसीम शेख यांनी सांगितले की –
    “युवा शक्ती हीच विक्सित भारताची खरी ताकद आहे. हा मंच तरुणांना आपली कला, कल्पना आणि नावीन्य दाखवण्याची संधी देईल तसेच समाजाप्रती जबाबदारीची जाणीव करून देईल.”
    कार्यक्रमात मुख्याध्यापक साजिद सर, सईद सर, फरहान सर यांच्यासह अनेक शिक्षक, मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.