Home शहादा ‘१० कोटी वृक्ष लागवड अभियान’ अंतर्गत जय किसान विद्यालयात हरित उपक्रम –...

‘१० कोटी वृक्ष लागवड अभियान’ अंतर्गत जय किसान विद्यालयात हरित उपक्रम – विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग

2
Green initiative at Jai Kisan Vidyalaya under '10 Crore Tree Plantation Campaign' – Spontaneous participation of students and teachers

जय किसान विद्यालय, असलोद – कार्यक्षेत्र मंदाना, ता. शहादा, जि. नंदुरबार

महाराष्ट्र शासनाच्या ‘१० कोटी वृक्ष लागवड अभियान’ अंतर्गत आज दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी जय किसान विद्यालय, असलोद येथे इको क्लबच्या पुढाकाराने आणि श्रमदानातून वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमात शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच शिक्षकवर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि हरित परिसर निर्मितीसाठी सामूहिक जबाबदारीची भावना वाढवणे हे होते.

संयुक्त विद्यमाने पार पडलेला उपक्रम:

सामाजिक वनीकरण विभाग आणि जय किसान विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या अभियानात शाळेच्या मैदानात एकूण २०० रोपे विद्यार्थ्यांच्या सहभागातून लावण्यात आली.

कार्यक्रमातील मान्यवर उपस्थित:

⦁ डॉ. मकरंद गुजर, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण, नंदुरबार

⦁ मा. सहाय्यक वनसंरक्षक चव्हाण

⦁ वनक्षेत्रपाल श्री. रामकृष्ण लामगे

⦁ श्री. दीपक जयसिंग गिरासे – मुख्याध्यापक / प्राचार्य

⦁ वनपाल – ईश्वर चव्हाण, अश्विनी चव्हाण, साधना वाडीले

⦁ वनरक्षक – भूपेश तांबोळी, गंगोत्री गवळे, दिपाली पाटील

⦁ उपशिक्षक व कर्मचारी वर्ग

विद्यार्थ्यांचा हरित संकल्प:

या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन आणि हरित परिसर निर्मितीचा दृढ संकल्प केला. सामुदायिक सहभागातून राबविण्यात आलेल्या या वृक्षारोपण मोहिमेमुळे शाळा परिसरात हरित वातावरण निर्मिती होऊन विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक मूल्ये रुजविण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.

#१०कोटीवृक्षलागवड#पर्यावरणसंवर्धन#socialforestry#nandurbar#greencampus#TreePlantation#EcoClub#StudentInitiative#SustainableFuture#GreenIndiaChallenge#वनविभाग#श्रमदान