
(नंदुरबार) भारत सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग यांच्या मार्फत ‘सुशासन सप्ताह-प्रशासन गाव कि ओर’ 19 डिसेंबर पासून सुरू झाला असून आज 21 डिसेंबर रोजी कोपर्ली येथे आयोजित शिबिरातून महसूल विभागामार्फत देण्यात येणारे विविध दाखले, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंगायो-वृध्दापकाळ योजना, इंगायो विधवा योजना व अपंग योजना तसेच पुरवठा विभागामार्फत देण्यात येणाऱ्या जसे अंत्योदय योजना व प्राधान्य कुंटुब लाभ योजना इत्यादी योजनांच्या विविध तक्रारींकडे निवारण करण्यात आले.
या शिबिरात #कोपर्ली, #अमळथे, #ओसर्ली, #बह्याणे, #सातुर्खे येथील नागरीकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतल्याचे तहसिलदार मिलींद कुलथे यांनी यांनी कळविले आहे.
००००००००००















