Home देश-विदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि त्यांना महाराष्ट्रातील पाऊस, पूरस्थिती आणि त्यातून शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली.

2
Chief Minister Devendra Fadnavis met Prime Minister Narendra Modi in New Delhi and briefed him about the #rain, #flood situation in Maharashtra and the loss caused to farmers.

केंद्र सरकारकडून भरीव मदतीसाठी एक निवेदनही त्यांना सादर केले.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिले. याशिवाय, महाराष्ट्रातील संरक्षण कॉरिडॉर, गडचिरोलीतील पोलाद उत्पादनासाठी सवलती, दहिसर येथील भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या जागेचे हस्तांतरण तसेच ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन करीत असलेले उपाय इत्यादींबाबत सविस्तर चर्चा मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी केली.