Home महाराष्ट्र डिजिटल सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासह सुरक्षित सायबर व्यवहार निर्माण करण्यासाठी डेटा सिक्युरिटी कौन्सिल...

डिजिटल सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासह सुरक्षित सायबर व्यवहार निर्माण करण्यासाठी डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडियामार्फत आयोजित ‘रिंग द बेल फॉर सिक्युरिटी’या मोहिमेचे उद्घाटन माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.

7
The 'Ring the Bell for Security' campaign, organized by the Data Security Council of India to promote digital security and create safe #cybertransactions, was inaugurated by Information Technology Minister Adv.

#डिजिटलइंडिया#डिजिटल व्यवहारांमुळे महाराष्ट्र हे जगातील डिजिटल क्षेत्रात प्रगतीशील राष्ट्रासाठी आदर्श ठरत आहे. तसेच सायबर सुरक्षा नियंत्रण प्रणालीमध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी यावेळी सांगितले.

#एआय च्या युगात डेटा सर्वात मौल्यवान ठरत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपला डेटा सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. #सायबरसुरक्षा ही केवळ संस्थांची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सायबर कोविडपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सायबर स्वच्छतेचा अवलंब करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले. अति-सामायिकरण टाळणे, समाजमाध्यमांवर जास्त माहिती न टाकणे तसेच ‘जिओस्पाय’सारख्या अल्गोरिदमपासून सावध राहणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (#BSE) येथे आयोजित या कार्यक्रमात सेबीचे कार्यकारी संचालक अविनाश पांडे, विविध उद्योगांचे प्रतिनिधी व शासकीय अधिकारी उपस्थित होते.