Home महाराष्ट्र महाराष्ट्रासह देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायकांच्या मंदिर परिसरात सुरु असणारी विकासाची...

महाराष्ट्रासह देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायकांच्या मंदिर परिसरात सुरु असणारी विकासाची कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात यावीत.

2
The ongoing development works in the Ashtavinayak temple area, which is a place of worship for millions of devotees in Maharashtra and the country, should be completed on time and in a quality manner.

या विकास आराखड्यांतर्गत काम करताना मंदिरांच्या मूळ स्ट्रक्चरला कोणताही धक्का न लावता प्रत्येक कामाला हेरिटेज टच द्यावा. श्री अष्टविनायक मंदिर विकास आराखडा भाविकांना दर्जेदार सोयी देण्याबरोबरच महाराष्ट्रातील पर्यटनवाढीसह अर्थव्यवस्थेला नवे बळ देणारा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

श्री क्षेत्र अष्टविनायक गणपती मंदिर परिसर विकास आराखड्यांतर्गत कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

#अष्टविनायक