
आंतरराष्ट्रीय सहकारीता वर्षानिमित्त सहकार क्षेत्रातील उत्कृष्टरित्या काम केलेल्या संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सत्कार हा अत्यंत चांगला उपक्रम असल्याचे गौरवोद्गार सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी काढले.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनतर्फे २६ वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम झाला. यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, असोसिएशनचे अध्यक्ष भाऊ कड, उपाध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, सह मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शंकरराव घोणसे यासह राज्यातील विविध सहकारी बँकाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.