Home शैक्षणिक वर्धा, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेची कार्यवाही सुरु करा- राज्यमंत्री...

वर्धा, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेची कार्यवाही सुरु करा- राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

2
Start the recruitment process for vacant posts in Wardha, Gondia, Bhandara districts - Minister of State Dr. Pankaj Bhoyar

 शालेय शिक्षण विभागाने वर्धा, गोंदिया, भंडारा जिल्ह्यासाठी मंजूर असलेल्या गट – अ, ब, आणि गट – क दर्जाच्या रिक्त पदांवर पात्र उमेदवारांच्या भरती प्रक्रियेची  कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.

वर्धा, गोंदिया, भंडारा जिल्ह्यासाठी मंजूर असलेल्या गट – अ, ब, आणि गट – क दर्जाच्या रिक्त पदांसंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. माधुरी सावरकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी वर्धा, गोंदिया, भंडारा जिल्ह्यासाठी मंजूर असलेल्या गट – अ, ब, आणि गट – क दर्जाच्या रिक्त पदांचा सविस्तर आढावा घेतला.  या जिल्ह्यातील सर्व रिक्त पदांची  भरती प्रक्रिया शालेय शिक्षण विभागाने तातडीने राबवण्याचे निर्देश राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी दिले.