(नंदुरबार) महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत खरीप हंगाम 2025 साठी “महा डीबीटी – शेतकरी योजना” पोर्टलवर 100% अनुदानावर प्रमाणित बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर हे अनुदान दिले जाणार आहे.
अर्ज कालावधी:
प्रारंभ : १६/०५/२०२५
अंतिम मुदत : २९/०५/२०२५
बियाणे वाटप कालावधी : १ ते ३ जून २०२५ दरम्यान
पात्र बियाणे:
सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका, ज्वारी, बाजरी, भात इत्यादी.
अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
MahaDBT Portal
महत्वाचे मुद्दे:
अर्ज करताना Farmer ID आवश्यक आहे.
निवड झालेल्या शेतकऱ्यांना वैयक्तिक (SMS) द्वारे कळविण्यात येईल.
निवडीनंतर ५ दिवसांत बियाणे उचलणे आवश्यक आहे.
लाभ मर्यादा: 0.20 हेक्टर ते 1.00हेक्टर
सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला गट, SHG, ग्रामविकास संस्था अर्ज करू शकतात.
अर्ज प्रक्रिया मार्गदर्शन:
MahaDBT पोर्टलवर लॉगिन करून → घटक निवड → बियाणे वाटप → पिक प्रकार → क्षेत्र तपशील → अर्ज सादर करा.
अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
आजच अर्ज करा आणि योजनेचा लाभ घ्या!
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, नंदुरबार
(कृषी विभाग – महाराष्ट्र शासन)
#खरीप2025#शेतकरीहित#100टक्केअनुदान#बियाणेयोजना#महाDBT#कृषीविभाग_नंदुरबार#FarmerFirst#FreeSeeds#AgriSupport#SeedDistribution2025