Home नंदुरबार कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना महत्त्वाची संधी!

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना महत्त्वाची संधी!

5
Important opportunity for farmers under Karmaveer Dadasaheb Gaikwad Empowerment and Self-Respect Scheme!

ासनास जमीन विक्रीस इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत

🗓️ समाज कल्याण विभाग

( नंदुरबार) अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील भूमिहीन व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना 04 एकर जिरायती किंवा 02 एकर बागायती जमीन 100% अनुदानावर देण्याची योजना शासनाने अमलात आणली आहे.

🟢 या योजनेअंतर्गत जमीन विक्रीस इच्छुक शेतकऱ्यांनी शासकीय रेडीरेकनर दराने आपली जमीन विक्रीसाठी अर्ज सादर करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, श्री. सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.

📋 जमीन विक्रीसाठी अटी व शर्ती (थोडक्यात):

✅ स्वतःच्या मालकीची किमान ४ एकर जिरायती / २ एकर बागायती जमीन असावी

✅ जमीन बोजारहित व वादमुक्त असावी

✅ सर्व मालकांची संमती व स्वाक्षरी आवश्यक

✅ बागायती जमिनीसाठी पाणी व रस्त्याची माहिती आवश्यक

✅ जमीन मोजणी करूनच खरेदीचा निर्णय होईल

✅ अर्ज केला म्हणजे जमीन विकावीच लागेल असे नाही

✅ शासनावर खरेदीचा बंधनकारक निर्णय लागू नाही

📍 अर्ज करण्याचे ठिकाण:

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकरतलाव रोड, नंदुरबार

#NandurbarUpdates#SamajKalyanVibhag#SablikaranYojana#KarmaveerGaikwadYojana#LandGrantScheme#SCWelfare#SocialJustice#भूमिहीनसाठीशासन