Home नोकरी-करिअर दर महिन्याला रोजगार मेळाव्याद्वारे जास्तीत-जास्त युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून द्यावा – मंत्री...

दर महिन्याला रोजगार मेळाव्याद्वारे जास्तीत-जास्त युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

1
Employment should be provided to maximum youth through employment fairs every month – Minister Chandrashekhar Bawankule

नागपूर: जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी पालकमंत्री रोजगार मेळाव्याचे आयोजन सुरु आहे. जास्तीत-जास्त युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होण्यासाठी दर महिन्याला हा उपक्रम आयोजित करण्याच्या सूचना आज महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिल्या. त्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली.

श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी तथा युवा फाउंडेशन व नॅशनल रिअल इस्टेट काउन्सिल (नरेडको) विदर्भच्या वतीने महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी येथे आयोजित ‘पालकमंत्री रोजगार मेळावा 2.0’ मध्ये मंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी कोराडीचे सरपंच नरेंद्र धनोले, माजी नगराध्यक्ष राजेश रंगारी यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

रोजगार मेळावा आयोजन समितीने यापूर्वीच्या पहिल्या रोजगार मेळाव्यात 136 उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान केली होती. उपक्रमातील आजचा हा दुसरा मेळावा असून यातही युवक-युवतींना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास पालकमंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केला. या उपक्रमांतर्गत दर महिन्याला रोजगार मेळावा आयोजित करून जास्तीत-जास्त रोजगार उपलब्ध करून द्यावा व पुढील रोजगार मेळाव्याची तयारी आतापासूनच सुरू करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. मेळाव्यात सहभागी कंपन्याच्या प्रतिनिधींचे आभार मानत यापुढेही तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.