आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेली पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (PMFME) ही ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी क्रांतिकारी ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी, महिला उद्योजक, युवक व लहान व्यावसायिकांना आर्थिक सहाय्याबरोबरच तांत्रिक व व्यावसायिक मार्गदर्शन दिले जात आहे.
एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) – नंदुरबारचा भरड धान्याचा वारसा:
ही योजना एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) या संकल्पनेवर आधारित आहे. नंदुरबार जिल्ह्यासाठी पौष्टिक तृणधान्ये (Nutritious Cereals) हे उत्पादन निश्चित करण्यात आले आहे. ज्वारी, बाजरी, नागली, वरई, रागी यांसारख्या स्थानिक धान्यांना प्रोत्साहन मिळत असून, आता इतर फळे व कृषी उत्पादनांवर आधारित प्रक्रिया उद्योगांनाही या योजनेतून लाभ मिळू शकतो.
योजनेत पात्र लाभार्थी:
⦁ वैयक्तिक लाभार्थी – युवक शेतकरी, महिला उद्योजक, कारागीर, LLP
⦁ गट लाभार्थी – स्वयंसहाय्यता गट (SHG), शेतकरी उत्पादक गट, सहकारी संस्था, कंपनी
योजनेची प्रमुख उद्दिष्टे:
1. फळे, भाजीपाला, धान्य, मसाले, मत्स्य, दूध व वनोत्पादनांवर आधारित सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग बळकट करणे.
2. सूक्ष्म उद्योगांना औपचारिक स्वरूप देऊन आर्थिक, तांत्रिक व व्यावसायिक मदत करणे.
3. विद्यमान उद्योगांचे विस्तारीकरण, आधुनिकीकरण व स्ववृद्धी.
4. ODOP अंतर्गत स्थानिक व पारंपरिक उत्पादनांना प्राधान्य.
5. बँक समन्वयातून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे.
6. ब्रॅंडिंग, पॅकेजिंग, मार्केटिंग संदर्भात तज्ज्ञ मार्गदर्शन.
आर्थिक सहाय्य:
⦁ वैयक्तिक लाभार्थी – भांडवली गुंतवणुकीवर ३५% अनुदान (कमाल ₹१० लाखांपर्यंत).
⦁ मार्केटिंग व ग्रेडिंग – ५०% अनुदान.
⦁ स्वयंसहाय्यता गट सदस्यांना – बीजभांडवल ₹४०,०००.
⦁ इन्क्युबेशन सेंटर – शासकीय संस्थांना १००% अनुदान.
अर्ज करण्याची पद्धत:
1. वैयक्तिक लाभार्थी – www.pmfme.mofpi.gov.in वर ऑनलाइन अर्ज.
2. गट लाभार्थी – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात Online / Office अर्ज.
3. बीजभांडवलासाठी – जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, MSRLM-UMED, NULM, NRLM किंवा MAVIM कार्यालयाशी संपर्क.
भविष्यातील संधी:
⦁ नंदुरबार जिल्ह्याच्या कृषी व वनोत्पादन क्षमतेला PMFME योजना नवी दिशा देऊ शकते.
⦁ स्थानिक उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळेल.
⦁ शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.
⦁ युवक व महिला स्वयंसहाय्यता गटांसाठी उद्योजकतेचे नवे दार उघडेल.
जिल्ह्यातील सर्व इच्छुकांनी या योजनेचा लाभ घेऊन स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन कृषी विभाग, नंदुरबार यांनी केले आहे.
#PMFME#Nandurbar#FoodProcessing#ODOP#NutritiousCereals#AtmanirbharBharat#WomenEntrepreneurship#SelfHelpGroups#Agripreneurs