
सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह, होल शिवार, नंदुरबार येथे आज मा. उपविभागीय अधिकारी श्रीमती अंजली शर्मा आणि मा. उपविभागीय अधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांनी पाहणी भेट दिली.
या भेटीदरम्यान त्यांनी वसतिगृहातील निवास व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षा, पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्य सुविधा तसेच विद्यार्थिनींना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक आणि पूरक सुविधांची तपशीलवार माहिती घेतली. विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या व त्यावर त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
#वसतिगृहपाहणी#नंदुरबार#sdminspection#girlshostel#socialjustice#AmbedkarHostel#anjalisharma#KrishnakantKanvaria#nandurbaradministration#educationforall#BetiBachaoBetiPadhao















