
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक–2025 शांततेत, पारदर्शक आणि सुयोग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी भूषविले.
बैठकीस उपस्थित विभाग
जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, महसूल, PWD, MSEDCL, परिवहन, उत्पादन शुल्क, बँकिंग व माहिती–जनसंपर्क विभागांसह मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी प्रशासन, RTO, निबंधक, LDM, तहसीलदार व निवडणूक अधिकारी उपस्थित होते.
प्रमुख निर्देश
मतदान केंद्रे – मूलभूत सुविधा, दुरुस्ती व आवश्यक सुधारणा
पोलीस विभाग – अतिसंवेदनशील केंद्रांची यादी, बंदोबस्त, VST/FST/SST पथके, वेबकास्टिंग सुरक्षा
निवासी उपजिल्हाधिकारी – आचारसंहिता कक्ष, शस्त्र जमा प्रक्रिया
विक्रीकर व बँकिंग – मोठे व्यवहार तपासणी, संशयास्पद व्यवहारांची नोंद
MSEDCL – मतदान केंद्र, सुरक्षा कक्ष, मतमोजणी केंद्रांना अखंड वीजपुरवठा
PWD – सुरक्षा कक्ष, साहित्य साठवण, निरीक्षकांसाठी सुविधा
निवडणूक अधिकारी – वाहतूक, कम्युनिकेशन प्लॅन, संवेदनशील केंद्र निश्चिती, मतदारयादी, मतपत्रिका, मतदान यंत्रांची तयारी
इतर विभाग – वाहन उपलब्धता, बसेस, मद्यविक्री तपासणी, सोशल मीडिया–जाहिरात नियंत्रण
प्रशासनाची वचनबद्धता
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सर्व विभागांनी समन्वयाने आणि जबाबदारीने कार्य करून निवडणूक प्रक्रियेत कोणतीही अनियमितता होऊ न देण्याचे निर्देश दिले.
नंदुरबार जिल्हा प्रशासन सुरक्षित, सुलभ आणि पूर्णतः पारदर्शक मतदान प्रक्रिया देण्यासाठी कटिबद्ध आहे.
#Nandurbar#Election2025#ZPElection#PanchayatSamiti#DistrictCollector#TransparentElections#GoodGovernance#AdministrationWorks















