Home महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन

2
Chief Minister Devendra Fadnavis pays tribute to the martyrs of the United Maharashtra struggle

मुंबई: महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त हुतात्मा चौक येथील स्मृतिस्थळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी २१ नोव्हेंबर हा दिवस ‘महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृति दिन’ म्हणून पाळला जातो. यावेळी स्मृतिस्थळावर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई मनपाचे आयुक्त भूषण गगराणी, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त देवेन भारती यांनीही पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी विविध पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.