YESummit – 2025 च्या दुसऱ्या दिवशी आयोजित बिझनेस पिचिंग स्पर्धा उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडली. तरुण उद्योजकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणे आणि नाविन्यपूर्ण व्यवसाय कल्पनांमुळे संपूर्ण वातावरण ऊर्जावान झाले होते.
या स्पर्धेत एकूण ९५ सहभागी तरुणांनी सहभाग नोंदवला असून, ७७ व्यवसाय सादरीकरणे सादर करण्यात आली. यामध्ये ४० सर्वसाधारण व्यवसाय कल्पना तर ३७ वैशिष्ट्यपूर्ण व वाढक्षम व्यवसाय कल्पना मांडण्यात आल्या. गटनिहाय सादरीकरणांमध्ये सक्षम गटाकडून ४०, संकल्प गटाकडून ३२ तर स्फूर्ती गटाकडून ७ सादरीकरणे करण्यात आली.
सहभागींनी त्यांच्या व्यवसाय कल्पनांमधून समस्या ओळख, नाविन्यपूर्ण उपाय, बाजारपेठेची समज, उत्पन्न मॉडेल आणि भविष्यातील वाढीची दिशा प्रभावीपणे मांडली. अनेक कल्पनांमध्ये स्थानिक गरजांवर आधारित उपाय, सामाजिक उद्योजकता आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर दिसून आला.
या उपक्रमाचे आयोजन Youthaid Entrepreneur Federation of India, Youthaid Foundation, CYDA, TGIC आणि UPS,जिल्हा प्रशासन, MAVIM, KVK, DSC आणि ASK यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
YESummit च्या या दुसऱ्या दिवशीच्या बिझनेस पिचिंग स्पर्धेमुळे तरुणांमध्ये उद्योजकतेबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला असून, नवउद्योजकांना योग्य व्यासपीठ, मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वाचे पाऊल ठरला आहे. एकत्र येऊन उद्योजकतेच्या माध्यमातून उज्ज्वल आणि आत्मनिर्भर भविष्यासाठी पुढे वाटचाल करण्याचा संदेश या दिवसातून देण्यात आला.
(Collector Office Nandurbar)
#YESummit2025#BusinessPitching#YouthEntrepreneurship#MakeInIndia#LocalToGlobal
















