Home महाराष्ट्र महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या...

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमधील आर्थिक व्यवहारांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

1
Financial transactions in personal benefit schemes implemented by the Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board will be investigated and strict action will be taken against the culprits.

सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक सहाय्य तसेच अत्यावश्यक व गृह उपयोगी संच देण्यात येणाऱ्या योजनांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या असून यासंदर्भात स्पेशल ड्राईव्ह सुरू करण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये तपासणी करून अनियमितता आढळलेल्या प्रकरणांत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी दिली.

तारापूर एमआयडीसीतील मेडली केमिकल कारखान्यात वायू गळतीमुळे चार कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर संबंधित कारखान्यावर गुन्हे दाखल करून तो बंद करण्यात आला आहे. मानवी चुकीमुळे व्हॉल्व्ह न उघडल्याने हा अपघात झाल्याचे निष्पन्न झाले असल्याचे कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी सांगितले.

सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक सहाय्य तसेच अत्यावश्यक व गृह उपयोगी संच देण्यात येणाऱ्या योजनांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या असून यासंदर्भात स्पेशल ड्राईव्ह सुरू करण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये तपासणी करून अनियमितता आढळलेल्या प्रकरणांत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राचा माता मृत्यूदर राष्ट्रीय सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या कमी असली तरी केवळ घट झाली म्हणून समाधान मानणे योग्य नाही. माता-बाल मृत्यू पूर्णपणे रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत केंद्र शासनाच्या एसओपी, जननी सुरक्षा योजना, एनआरसी व एसएनसीयू योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषदेची स्वतंत्र यंत्रणा असून ग्रामविकास विभागाची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाणार नाहीत. तसेच या कामांचा दर्जा राखला जाईल, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य सचिन अहिर यांनी सोलापूर जिल्हा परिषदेअंतर्गत नियमांचे उल्लंघन करून निविदा प्रक्रिया राबविल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सतेज पाटील, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.

राज्यातील ज्या गावात स्मशानभूमीसाठी जागा नाही, अशा गावात स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करणे आणि स्मशानभूमी बांधणे यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य डॉ. परिणय फुके यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर, शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला.

#हिवाळीअधिवेशन

#हिवाळीअधिवेशन२०२५

#हिवाळी_अधिवेशन_नागपूर

#WinterSession

#WinterSessionNagpur