
राज्यातील मोठ्या बाजार समित्यांना ‘राष्ट्रीय बाजार समित्या’ म्हणून श्रेणीउन्नत करुन शेतकऱ्यांच्या शेतीमालास आतंरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून दिली जाईल, असे श्री.रावल यांनी यावेळी सांगितले.
तालुकास्तरावरील कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या शेतकऱ्यांचा शेतीमाल विक्री करण्याचे हक्काचे ठिकाण आहे. शेतकरी-व्यापारी-मापारी-हमाल या साखळीच्या माध्यमातून विक्री प्रक्रिया चालते. ही साखळी अशीच अबाधित राहण्यासाठी व्यापाऱ्यांनी बाजार समितीसोबत समन्वयाने कार्य करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित शेतीमालास राज्य, देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी विभागाव्दारे मुंबई येथे मोठे हब निर्माण करण्याचे नियोजन आहे. त्याच्या माध्यमातून रेल्वे, भूमार्ग व समुद्री मार्गाने उत्पादित मालास सर्वस्तरावर बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाईल, असेही श्री. रावल यावेळी म्हणाले.
यावेळी पणन महामंडळाचे संचालक संजय कदम, पणन सहसचिव विजयकुमार लहाने, सहसंचालक राजेंद्र तराळे यांच्यासह राज्यातील व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.















