Home तळोदा बिबट्याचा हल्ल्यात १२ वर्षीय बालकाचा मृत्यु

बिबट्याचा हल्ल्यात १२ वर्षीय बालकाचा मृत्यु

92
leopard attack
leopard attack

(तळोदा ) शेतात आउत हाकलत असलेल्या बाबांना मदत करण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय बालकावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात बालकाचा जागीच मृत्यू झाला. तालुक्यातील दलेलपूर शिवारात बुधवारी ११ वाजता घडली घटना आहे. वन विभागाने यापूर्वीच बिबट्यास जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केले असते तर बालकाला आपले प्राण गमवावे लागले नसते अशी संतप्त प्रतिक्रिया जमावाकडून व्यक्त करण्यात आली. (A 12-year-old boy died in a leopard attack)

बिबट्या हल्ला : वन विभागाने बिबट्यास जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केले असते, तर बालकाला आपले प्राण गमवावे लागले नसते : ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तळोदा तालुक्यातील दललपुर शिवारात असलेल्या शेत मालक बाबू धानका यांच्या शेतात खेत्या पारशी वसावे हे आपल्या नातवासोबत आउत हाकलत होते. दरम्यान अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने १२ वर्षीय गुरु भरत वसावे या बालकाच्या मानेवर जोरदार प्रहार करत बिबट्याने चावा घेतल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. जवळ असलेल्या आजोबांनी ते दृश्य पहिल्या बरोबर आरडा,ओरड केली. स्वत:च्या जीवाची परवा न करता बैल हाकलन्यासाठी जवळ असलेल्या आरच्या काठीने बिबट्यास मारून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. बिबट्या त्या बालकास सोडत नव्हता त्याला घेऊन पडत असताना आजोबाने जवळ असलेली आर बिबट्यास टोचल्यामुळे अखेर त्या बिबट्याने तेथून पळ काढला. ही घटना गावात कळाल्यानंतर गावकरी घटना स्थळी दाखल झाले.  वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटना कळविली.

leopard attack taloda

बिबट्या हल्ला : वन विभाग कर्मचाऱ्यांची घटनास्थळी धाव

घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल स्वप्नील भामरे, वनपाल वासुदेव माळी, वनरक्षक जाण्या पाडवी, राहुल कोकणी, आशुतोष पावरा आदींसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी परिसरातील ग्रामस्थांची गर्दी करीत वनविभागावर आपला संताप व्यक्त केला. दरम्यान गुरू जवळ जाऊन पाहिले असता त्याच्या मानेच्या मागच्या बाजूस व गळ्याचा भागाला दात उमटले होते. रक्तस्त्राव अधिक होत असल्याने बालकास उपचारासाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी पाहणी केली असता बालक जागीच ठार झाल्याचे  घोषित केले.