
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांतील बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी आयसीडीएस विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने Joint Screening मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमेबाबतची बैठक मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
बैठकीत जिल्हाधिकारी महोदयांनी सूचित केले की, प्रत्येक अंगणवाडीत सर्व बालकांची आरोग्य तपासणी (Joint Screening) करण्यात येईल. ही मोहीम 10 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2025 या कालावधीत पार पडणार आहे.
पथकाची नियुक्ती:
या मोहिमेसाठी स्वतंत्र पथक नेमण्यात येणार आहे. त्यात टीएचओ (Taluka Health Officer), एनएम (Nurse Midwife), अंगणवाडी सेविका आणि आयसीडीएस सुपरवायझर यांचा समावेश असेल. हे पथक दररोज बालकांची तपासणी करून त्याचे डेटा त्याच दिवशी ‘पोषण ट्रॅकर’ मध्ये नोंदवणार आहे.
साधनसामग्रीची तपासणी:
अंगणवाडी सेविकांकडे वजन काटा, stadiometer, infantometer आणि झोळी या आवश्यक साधनांची उपलब्धता तपासण्यात येणार असून, ज्यांच्याकडे साधनांची कमतरता आहे त्यांना ती त्वरित पुरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
उद्दिष्ट:
या उपक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे जिल्ह्यातील प्रत्येक बालकाच्या पोषण व आरोग्य स्थितीचा बारकाईने आढावा घेणे आणि आवश्यक त्या उपचार व पूरक पोषण सेवेची तात्काळ अंमलबजावणी करणे.
‘सुदृढ बालक, सशक्त नंदुरबार’ या ध्येयाने जिल्हा प्रशासनाने हा आरोग्य उपक्रम सुरू केला असून, तो बालकांच्या आरोग्य संरक्षणासाठी एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे.
#बालआरोग्य#पोषणअभियान#ICDS#HealthDepartment#Nandurbar#DrMitaliSethi#JoinScreening#सुदृढबालकसशक्तनंदुरबार















