Home महाराष्ट्र राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या पात्रतेस मान्यता देणारी सध्याची जिल्हास्तरीय...

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या पात्रतेस मान्यता देणारी सध्याची जिल्हास्तरीय समिती ऐवजी तालुकास्तरावर समिती स्थापन करावी.

4
A committee should be established at the taluka level instead of the current district-level committee that approves eligibility for the Rajiv Gandhi Student Accident Relief Grant Scheme.

जेणेकरून या योजनेचे प्रस्ताव लवकर मार्गी लागतील. तसेच संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी असे प्रस्ताव स्वतः तयार करून पाठवावेत, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मंत्रालयात या विषयी झालेल्या बैठकीत दिले.

यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, प्रधान सचिव रणजित सिंह देओल, संचालक कृष्णकुमार पाटील, उपसचिव तुषार महाजन यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.