Home नंदुरबार ई-गव्हर्नन्स सक्षमीकरणासाठी एक ठोस पाऊल ई-ऑफीस प्रणालीबाबत आढावा बैठक संपन्न

ई-गव्हर्नन्स सक्षमीकरणासाठी एक ठोस पाऊल ई-ऑफीस प्रणालीबाबत आढावा बैठक संपन्न

2
A concrete step towards empowering e-governance: Review meeting on e-office system concluded

मा. मुख्यमंत्री 100 दिवस कृती आराखडा – सप्तसूत्री कार्यक्रमांतर्गत, श्री. हरिष भामरे (निवासी उपजिल्हाधिकारी) यांच्या अध्यक्षतेखाली

जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे ई-ऑफीस प्रणाली बाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

📢 निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सदर बैठकीत –

📌 सर्व महसूल सहायक व सहायक महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ई-ऑफीस प्रणालीच्या कार्यालयातील वापरांबाबत आढावा घेतला. तसेच ई ऑफीस प्रणालीवर प्राप्त टपालांवर विहित कालमर्यादेत कार्यवाही करणे बाबत निर्देश दिलेत.

📌 पारदर्शकता, कार्यक्षमता आणि वेळेची बचत सुनिश्चित करणाऱ्या या प्रणालीद्वारे पुढे सर्व शासकीय फाईल्स ई-ऑफीसद्वारेच सादर करण्याचे निर्देश दिले.

📌 नागरिकांना त्यांच्या तक्रारी/निवेदने यावर झालेल्या कारवाईची माहिती घरबसल्या मिळावी, याबाबत सूचनाही दिल्या. याकरिता नागरिकांच्या निवेदन/ तक्रारी यांवर त्यांचा भ्रमणध्वनी अथवा ई- मेल असेल तर तो नोंदविण्यात येवून त्यावर त्यांचे निवेदन / तक्रारी अर्ज हे कार्यवाहीस्तव कोणत्या कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहेत याबाबत माहिती कळविण्यात यावी.

👥 उपस्थित मान्यवर:

▪️ श्री. सतिष निकम – नायब तहसिलदार, अभिलेख शाखा

▪️ श्री. जयेश खैरनार – जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, IT कक्ष

▪️ तसेच सर्व सहायक महसूल अधिकारी व महसूल सहाय्यक

#ईऑफीस#DigitalMaharashtra#GoodGovernance

#सप्तसूत्री#MahaIT#NandurbarCollectorate