
(नंदुरबार)
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB), मुंबई यांच्या वतीने ‘वार्तालाप’ – संवाद परिषद नंदुरबार येथे यशस्वीपणे पार पडली. ‘कौशल्य ते शाश्वतता (From Skills to Sustainability)’ या विषयावर केंद्रित या परिषदेमध्ये जिल्ह्यातील 53 पत्रकारांनी सहभाग घेतला आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांवरील अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांशी थेट संवाद साधला.
उदघाटन व प्रमुख उपस्थिती:
उद्घाटन प्रसंगी क्रिडा प्राधिकरणाचे प्रादेशिक संचालक श्री. पांडुरंग चाटे, PIB मुंबईचे संचालक श्री. सय्यद रबीहाश्मी व जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी उपस्थित होते. PIB च्या सहाय्यक संचालिका कु. निकिता जोशी यांनी या संवाद परिषदेच्या उद्दिष्टांची रूपरेषा मांडली.
डॉ. मित्ताली सेठी यांनी पत्रकारांना प्रशासनाचे कान आणि डोळे असे संबोधून त्यांच्या सामाजिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. PIB संचालकांनी भारतातील माध्यम सशक्ततेचे चित्र मांडत, 1.55 लाख पेक्षा अधिक प्रकाशने आणि 900 हून अधिक टीव्ही चॅनेल्सद्वारे ‘वार्तालाप’चा व्यापक परिणाम स्पष्ट केला.
विषय सादरीकरण आणि थेट संवाद:
आदिवासी उत्पादकतेपासून रोजगारापर्यंत – TRIFED सत्र:
TRIFED चे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. अजित वच्छानी यांनी ‘Crafting Futures’ या विषयावर संवाद घेतला. नंदुरबार जिल्ह्यातील 11 वनधन विकास क्लस्टर कार्यरत असून, ट्रायफेडच्या मदतीने आदिवासी उत्पादने 6 पट अधिक नफ्यावर विकली जात आहेत. यामध्ये महुआ लाडू, मशरूम प्रॉडक्ट्स इत्यादींचा यशस्वी अनुभव beneficiaries ने शेअर केला.
‘Khelo Bharat Niti 2025’ आणि आदिवासी खेळाडूंना चालना – SAI सत्र:
SAI प्रादेशिक संचालक श्री. चाटे व सहाय्यक संचालिका अपूर्वा मंढा यांनी क्रीडाक्षेत्रातील नव्या धोरणांची माहिती दिली. चंपारणसारख्या ग्रामीण भागातून खेळाडू घडवण्यावर भर देण्यात येत आहे. यामध्ये शारीरिक, मानसिक प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य देण्याची ग्वाही देण्यात आली.
‘लाल मिरचीपासून बाजारपेठेपर्यंत’ – स्पाईसेस बोर्ड सत्र:
डॉ. ममता धनकुटे, सहाय्यक संचालिका, स्पाईसेस बोर्ड यांनी नंदुरबारच्या लाल मिरची क्षेत्रातील संभाव्यता मांडली. चिली फ्लेक्स, पावडर यांसारख्या मूल्यवर्धित उत्पादने आणि प्रक्रिया उद्योगाविषयी माहिती दिली.
‘वन स्टेशन, वन प्रॉडक्ट’ – पश्चिम रेल्वे उपक्रम:
मुख्य वाणिज्य निरीक्षक श्री. संदीपकुमार गुप्ता व मुख्य माल लिपिक प्रमोद ठाकूर यांनी स्थानिक उत्पादने रेल्वे स्थानकांवर विक्रीसाठी कशा प्रकारे पुढे नेता येतील, याविषयी मार्गदर्शन केले.
PIB कार्यशाळा व समारोप:
PIB चे सहाय्यक संचालक कु. निकिता जोशी आणि मीडिया अधिकारी कु. सोनल तुपे यांनी PIB च्या कार्यपद्धती, माध्यमांना मिळणाऱ्या सेवा व माहिती स्त्रोतांची माहिती दिली. पत्रकारांसाठी विश्वासार्ह स्रोत म्हणून PIB कसे महत्त्वाचे आहे, हे त्यांनी समजावले.
आरोग्य आणि पोषणावरील प्रदर्शन (24 ते 26 जुलै 2025):
छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर, नंदुरबार येथे तीन दिवसीय आरोग्य व पोषण प्रदर्शन सुरु झाले असून, याचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते झाले. आरोग्य, महिला व बालविकास, शिक्षण, NSS आणि माय भारत कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी विनामूल्य असून, सकाळी 9 ते सायं 6 या वेळेत 24 ते 26 जुलैदरम्यान खुले राहणार आहे.

#vartalap2025#pibmumbai#MediaOutreach#skillstosustainability#TRIFED#KheloBharat#spicesboard#OneStationOneProduct#nandurbarnews#mitalisethi















