
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी नंदुरबार जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनने एक समाजभानाची भूमिका घेत पुढाकार दाखवला आहे.
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात , नंदुरबार जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन यांच्या वतीने ₹21,000/- (एकवीस हजार रुपये) इतक्या रकमेचा देणगी धनादेश मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. ही देणगी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत पुरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिली गेली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की —
“नंदुरबार जिल्हा नेहमीच समाजहिताच्या कामांत अग्रेसर राहिला आहे. पेन्शनर्स असोसिएशनने दाखवलेली संवेदनशीलता व सामाजिक बांधिलकी ही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. प्रशासन अशा जनसहभागातूनच अधिक सक्षम आणि मानवतावादी बनते.”
पेन्शनर्स असोसिएशनचे प्रतिनिधींनी सांगितले की, “आम्ही निवृत्त असलो तरी समाजाप्रती असलेली जबाबदारी संपलेली नाही. पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना कमी करण्यासाठी ही छोटीशी मदत आमच्या भावना व्यक्त करण्याचे माध्यम आहे.”
कार्यक्रमाचे वातावरण एकात्मता आणि सामाजिक जबाबदारीने भारलेले होते. जिल्हाधिकारी महोदयांनी असोसिएशनचे मनःपूर्वक आभार मानले आणि सर्वांना अशा सामाजिक कार्यात सहभागासाठी प्रोत्साहित केले.
#Nandurbar#DrMitaliSethi#CollectorNandurbar#FloodRelief#CMReliefFund#PensionersAssociation#SocialResponsibility#GoodGovernance#NandurbarAdministration#DisasterRelief#MaharashtraFloods#पुरग्रस्तमदत#नंदुरबार#डॉमित्तालीसेठी#एकहातमदतीचा















