
शर्यत सुरू होताच अश्व प्रेमींनी प्रचंड जल्लोष झाला. एका बाजूला इंजिनचा गडगडाट आणि दुसऱ्या बाजूला धावणाऱ्या घोड्यांची धमक, अशा वातावरणात ही रोमांचक रेस पार पडली. शेवटी घोड्यांनी आपला नैसर्गिक वेग आणि दमदार ताकद दाखवत बुलेटला मागे टाकत बाजी मारली.
वेगाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोड्यांनी या रेसमध्ये पुन्हा एकदा सिद्ध केले की त्यांचा वेग कोणत्याही यंत्रमानवावर भारी आहे.घोडे बाजारात आधीच भरगच्च गर्दी होती. त्यातच रेस पाहण्यासाठी अश्वशौकीन, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांची मोठी उत्सुकता दिसून आली.















