Home महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, सीईओ, ANSR, विक्रम...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, सीईओ, ANSR, विक्रम आहुजा, ब्रुकफिल्डचे अंकुर गुप्ता यांच्यासोबत जिओ कन्व्हेशन सेंटर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले.

1
A meeting was organized at the Jio Convention Center with Chief Minister Devendra Fadnavis, along with Microsoft CEO Satya Nadella, CEO, ANSR, Vikram Ahuja, and Brookfield's Ankur Gupta.

महाराष्ट्राला GCC (जीसीसी) हब बनवण्याच्या दिशेने हा अतिशय महत्त्वाचा टप्पा असून ब्रुकफील्ड कंपनी मुंबईत सुमारे २० लाख चौरस फूट क्षेत्रावर आशियातील सर्वात मोठे Global Capability Center (GCC) अर्थात जागतिक क्षमता केंद्र उभारणार आहे. या प्रकल्पातून १५,००० थेट आणि ३०,००० अप्रत्यक्ष असे एकूण ४५,००० रोजगार निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील प्रतिभा, पायाभूत सुविधा आणि उद्योगसुलभ वातावरणामुळे महाराष्ट्र जागतिक कॅपेबिलिटी सेंटरचे पसंतीचे ठिकाण ठरत आहे. नव्या जीसीसी धोरणामुळे मोठ्या प्रमाणात कौशल्याधारित रोजगारनिर्मिती आणि आर्थिक वृद्धी साधली जाईल. जागतिक लॉजिस्टिक्स क्षेत्रातील अग्रणी कंपनी FedEx देखील मुंबई–नवी मुंबई विमानतळ परिसरात आपल्या जीसीसी आणि इतर ऑपरेशन्ससाठी गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. मायक्रोसॉफ्टने आपल्या गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राचा विचार करावा, याबाबत त्यांना विनंती केली असून सध्या देखील त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक महाराष्ट्रामध्येच आहे. आगामी काळात मायक्रोसॉफ्ट मोठी गुंतवणूक करेल आणि महाराष्ट्राला कृत्रिम बुद्धिमत्तेचे केंद्र बनवण्यासाठी पुढाकार घेईल, असा विश्वासही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी केला.

या ठिकाणी आयोजित मायक्रोसॉफ्ट एआय टूर (Microsoft AI Tour) कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सहभाग घेतला. सत्या नडेला यांनी महाराष्ट्र सरकारसोबत विकसित केलेल्या Crime AIOS प्लॅटफॉर्मचे विशेष प्रदर्शन या कार्यक्रमात केले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने गुन्हे नियंत्रणात महाराष्ट्राने दिलेले मॉडेल देशभरासाठी दिशा देणारे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

#GCC

#AI

#Brookfield