
नंदुरबार शहरातील My Child Public School, Nandurbar येथील विद्यार्थी व शिक्षकवर्ग यांनी सामाजिक बांधिलकीचा उत्कृष्ट आदर्श घालत पूरग्रस्त बांधवांसाठी आर्थिक मदत सुपुर्त केली.
या उपक्रमात एकूण 250 विद्यार्थ्यांनी स्वखुशीने निधी जमा केला. जमा झालेला निधी रक्कम रूपये 23,000/- आज आपत्ती व्यवस्थापन , जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे मा.जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांच्या उपस्थितीत सुपुर्त करण्यात आला.
या प्रसंगी शाळेच्या चेअरमन सौ. पूजा म.वाणी, मुख्याध्यापिका सौ.वृषाली स.पाटील, कॉर्डिनेटर सौ.पोर्णिमा न.कासार, सौ.सोनल शहा, सौ.माधुरी माळी, सौ.नमिता नागरे, सौ.अपर्णा माळी तसेच शाळेतील के.जी.व प्रायमरी विद्यार्थी उपस्थित होते.
मा.जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करताना सांगितले की —
“लहान वयातही जबाबदारीची जाणीव आणि संवेदनशीलता जपणारी ही मुलेच उद्याची जबाबदार नागरिक बनतील. समाजासाठी योगदान देण्याची ही भावना प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, हेच खरे शिक्षण आहे.”
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी केवळ मदत केली नाही तर “दिवाळीचा आनंद वाटूया – दु:खातही साथ देऊया” हा माणुसकीचा संदेश दिला.
शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कार्यात नागरिकांचा सहभाग वाढविण्याच्या दिशेने हा उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे. जिल्हा प्रशासनाने शाळेच्या सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे या सामाजिक कार्यासाठी अभिनंदन केले आहे.
#Nandurbar#डॉमित्तालीसेठी#DistrictAdministration#MyChildPublicSchool#SocialResponsibility#FloodRelief#DisasterManagement#StudentInitiative#GoodGovernance#NandurbarDistrict#TeamNandurbar#HumanityFirst#PublicService#DiwaliForAll#Inspiration#YouthForChange















