तालुका अक्कलकुवा अंतर्गत मौजे गुली आंबा येथे पशुवैद्यकीय चिकित्सालय, खापर यांच्या वतीने विशेष पशुचिकित्सा कार्य मोहीम आयोजित करण्यात आली. या मोहिमेमध्ये गोवर्गीय व शेळीवर्गीय जनावरांसाठी विविध आरोग्य उपक्रम राबविण्यात आले.
उपक्रमांमध्ये समाविष्ट होते:
⦁ जनावरांचे लसीकरण
⦁ जंत निर्मूलन
⦁ गर्भ तपासणी व वंधत्व तपासणी
⦁ आजारी जनावरांवर उपचार
सदर मोहिमेच्या माध्यमातून पशुपालकांना त्यांच्या जनावरांच्या आरोग्याविषयी जागरूक करण्यात आले आणि मोफत सेवा देऊन पशुधनाचे संरक्षण सुनिश्चित करण्यात आले.
या मोहिमेत परिश्रम घेणारे अधिकारी व कर्मचारी:
डॉ. रूपा आव्हाड, पशुधन विकास अधिकारी
श्री अशोक वसावे, वर्णोपचारक
श्री देवेंद्र पाटील, परिचर
या संपूर्ण मोहिमेत गावातील पशुपालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला व पशुवैद्यकीय सेवा उपभोगल्या.
डॉ. तुषार गीते, जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, नंदुरबार यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, “अशा आरोग्य मोहिमा ग्रामीण भागातील पशुधन संरक्षणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत व त्यातून पशुपालकांचा आत्मविश्वास वाढतो.
#guliamba#nandurbarkar#VeterinaryCamp#animalhealthcertificate
#pashusamvardhan#LivestockWelfare#VaccinationDrive#GovtInitiative#Akkalkuwa