Home महाराष्ट्र अभाविप आयोजित भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त “कलश यात्रे” चे...

अभाविप आयोजित भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त “कलश यात्रे” चे उद्घाटन संपन्न

2
ABVP organizes “Kalash Yatra” to mark 150th birth anniversary of Bhagwan Birsa Munda

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धुळे विभागाच्या वतीने सिनिअर महाविद्यालय, तळोदा येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित “कलश यात्रा” चे उद्घाटन तळोदा-शहादा विधानसभेचे आमदार राजेश पाडवी, अभाविप देवगिरी प्रदेशाचे नवनिर्वाचित प्रदेशमंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे यांच्या हस्ते करण्यात आले.
       याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष रोहित माळी, प्राचार्य डॉ. हेमंत दलाल, शहर अध्यक्ष प्रा. आर. डी. मोरे, शहर मंत्री गितेश राजपूत सह आदी विद्यार्थी तथा प्राध्यापक उपस्थित होते. या कलश यात्रेत झारखंड राज्यातील उलिहातु येथील भगवान बिरसा मुंडायांच्या जन्मगावातून पवित्र मातीचा कलश आणण्यात आलेले आहे.

     या यात्रेच्या माध्यमातून भगवान बिरसा मुंडा यांचा संदेश तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा हाच उद्देश समोर ठेवून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ने भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने या कलशात्रेचे आयोजन केले आहे. नंदुरबार, धुळे आणि जळगाव या तीन जिल्ह्यांमधून ११ तालुक्यांमध्ये, १५ महाविद्यालये आणि २५ वस्तीगृहांमधून ही यात्रा जाणार असून ३०,००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत भगवान बिरसा मुंडा यांचा संदेश पोहोचण्याचा उद्देश घेऊन विद्यार्थी परिषद ने कलश यात्रेचे आयोजन केले आहे. एवढेच नव्हे तर मार्गावरील खेड्यापाड्यांमध्ये नागरिकांमध्ये प्रतिमा पूजन करून १०००० पेक्षा जास्त नागरिकांपर्यंत भगवान बिरसा मुंडा यांचा संदेश पोहोचण्याचा उद्देश घेऊन विद्यार्थी परिषदेने या कलश यात्रेचे आयोजन केले आहे.

          या कलश यात्रेचे उद्घाटन दिनांक १९ जानेवारी रोजी तळोदा शहादा मतदार संघातील आमदार राजेश पाडवी यांच्या उपस्थितीमध्ये तळोदा येथील सीनियर महाविद्यालयमधून करण्यात आले. प्रमुख उपस्थिती म्हणून अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे हे उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष रोहित माळी, महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत दलाल, अभाविप शहराध्यक्ष प्रा. राजेंद्र मोरे, शहर मंत्री गितेश राजपूत उपस्थित होते.
         उद्घाटन प्रसंगी प्रास्ताविक रोहित माळी यांनी केली. तसेच अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री डॉ. वरूणराज नन्नवरे यांनी विद्यार्थी परिषदेचे मांडणी केली. त्यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी यात्रेला शुभेच्छा देत विद्यार्थी परिषदेचे कौतुक केले. ज्या ज्या वेळेस देशांमध्ये संकटे येतात, त्या त्या वेळेस विद्यार्थी परिषद पुढाकार घेऊन आपले महत्त्वाची भूमिका बजावत असते असा संदेश समस्त उपस्थित छात्र शक्तीला दिला. अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ. हेमंत दलाल यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. राजेंद्र मोरे यांनी मानले.
या यात्रेच्या यशस्वितेसाठी नंदुरबार जिल्हा संयोजक साक्षी जगदाळे, रोहित माळी, कार्तिक तोमर, कमलेश राजपूत, गणेश गुरव यांनी मेहनत घेतली.