Home नंदुरबार जिल्हा जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजनेला वेग!

जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजनेला वेग!

3
Accelerate the silt-free dam and silt-free Shivar scheme in the district!

शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

शासनाची महत्वाकांक्षी योजना

गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार आता जिल्ह्यात जलद गतीने राबवली जात आहे!

ही योजना

🌾 शेतीसाठी सुपीक माती

💧 धरणातील पाणीसाठा वाढवणे

या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे.

आज लोंढरे (ता. शहादा) येथे

जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेठी यांच्या हस्ते

या कामाचा शुभारंभ झाला.

उपस्थित मान्यवर:

👷‍♂️ श्री. निलेश पाटील (ल.पा. सिंचन विभाग)

👷‍♂️ श्री शैलेंद्र गवते, नायब तहसीलदार, तहसील कार्यालय शहादा

🌱 श्री. गुणवंत पाटील, श्री. गोपाल पाटील (पाणी फाउंडेशन)

🚜 सौ. स्वाती पाटील (टाटा मोटर्स)

🤝 श्री. जितेंद्र पाटील (नाम फाउंडेशन)

🏡 ग्रामपंचायत प्रतिनिधी, सरपंच, शेतकरी आणि लाभार्थी

ही योजना

महाराष्ट्र शासन, नाम फाउंडेशन आणि टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने राबवली जात आहे.

योजनेचे फायदे:

✅ तलावातील गाळ काढून जलसाठा वाढतो

✅ गाळामुळे जमीन सुपीक होते

✅ कृषी उत्पादनात वाढ

शेतकऱ्यांनो, ही सुवर्णसंधी गमावू नका!

आपली शेती सुपीक करा, जलसंधारणाला हातभार लावा!

– जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेठी यांचे आवाहन

#गाळमुक्तधरण#गाळयुक्तशिवार#जलसंधारण#शेतीवाढ#नंदुरबार#शहादा#Maharashtra