Home नंदुरबार जिल्हा बालक व महिलांच्या सर्वांगीण सुरक्षेसाठी प्रशासन कटिबद्ध — नंदुरबार जिल्ह्यात विविध समित्यांच्या...

बालक व महिलांच्या सर्वांगीण सुरक्षेसाठी प्रशासन कटिबद्ध — नंदुरबार जिल्ह्यात विविध समित्यांच्या आढावा बैठका संपन्न

2
Administration committed to overall safety of children and women — Review meetings of various committees concluded in Nandurbar district

मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली व मा. अपर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे महिला व बालविकास विभागाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली.

बैठकीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या खालील महत्वाच्या योजनांवर व समित्यांच्या कामकाजावर चर्चा करण्यात आली:

“बेटी बचाओ, बेटी पढाओ” अभियानाचा आढावा

आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी स्थापन जिल्हास्तरीय समितीचे कार्य

जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्पलाइनच्या कार्यक्षमतेचा आढावा

बालगृहात दाखल मुलांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा पुनर्वसन समितीचा आढावा

बाल कल्याण समिती आणि जिल्हा स्तरीय सनियंत्रण समितीचे कार्यपरीक्षण

बैठकीत मा. अपर जिल्हाधिकारी यांनी विशेष निर्देश दिले की —

🔹 “बेटी बचाओ, बेटी पढाओ” अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी केंद्रांना जीपीएस प्रणालीशी जोडणे अत्यावश्यक आहे.

🔹 जनजागृतीचे कार्यक्रम स्थानिक भाषेत राबवून ग्रामीण भागातील महिलांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवावी.

🔹 आदिवासी विकास विभाग व समाजकल्याण विभागांतर्गत असलेल्या वसतिगृहांमध्येही महिला आणि बालकांच्या कायद्यांबाबत जागृती कार्यक्रम आयोजित करावेत.

🔹 शाळाबाह्य मुलींना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष अभियान राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तसेच ज्या गावांमध्ये ग्रामबाल संरक्षण समिती स्थापन झालेली नाही, अशा गावांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. व गटविकास अधिकाऱ्यांच्या समन्वयातून तातडीने समित्या गठीत करण्याचे निर्देश देण्यात आले.

बैठकीत महिला व बालविकास विभाग, आदिवासी विकास विभाग, समाजकल्याण विभाग, शिक्षण विभाग तसेच विविध समित्यांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीतून नंदुरबार जिल्ह्यात बालकांचे संरक्षण, महिलांच्या सुरक्षेचे बळकटीकरण आणि समाजातील संवेदनशील विषयांवर कृतीशील प्रशासनाचे बांधिलकी पुन्हा अधोरेखित झाली आहे.

#Nandurbar#डॉमित्तालीसेठी#जिल्हाधिकारीनंदुरबार#महिला_व_बालविकास#BetiBachaoBetiPadhao#ChildProtection#WomenEmpowerment#GoodGovernance#DistrictAdministration#TeamNandurbar#PublicAwareness#ShasanAplyaDari#EmpoweredWomen#SocialAwareness#NandurbarUpdates