
इमारत किंवा सिमेंट-विटांचं बांधकाम नाही, तर ते आपल्या स्वप्नांचं, आशा-आकांक्षांचं प्रतिक असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले.१९२० च्या सुमारास उभारण्यात आलेल्या या ब्रिटिशकालीन बीडीडी चाळी मुंबईच्या सर्वांगीण विकासाच्या, इतिहासाच्या साक्षीदार ठरल्या आहेत. मात्र, या चाळींचा इतिहास हा केवळ इमारतींचा इतिहास नाही; तर तो इथं राहणाऱ्या कष्टकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या संघर्ष, जिद्द आणि एकात्मतेचा इतिहास आहे. गेली जवळपास चार दशके येथील रहिवासी अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि सन्मानाने जगता येईल अशा घराच्या प्रतीक्षेत होते. आज या दीर्घ संघर्षाला यश मिळालं असून, बीडीडीवासीयांच्या आयुष्यात एका नव्या पर्वाची सुरुवात होत असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले.















