नंदुरबार जिल्ह्यात कृषि क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढविणे, पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे, पिकांची उत्पादकता वाढविणे, तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे या उद्देशाने ‘कृषि समृद्धी योजना २०२५-२६’ सुरू करण्यात आली आहे.
या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून कृषि क्षेत्रात स्थैर्य आणि प्रगती साधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
योजनेचे प्रमुख उद्दिष्टे:
1. कृषि क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक वाढविणे
2. पिक विविधीकरण आणि मूल्यसाखळी बळकटीकरण
3. शाश्वत, हवामान अनुकूल शेतीला प्रोत्साहन
4. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे
योजनेअंतर्गत उपलब्ध घटक:
शेतकऱ्यांना खालील अनुदानित घटकांसाठी अर्ज करता येईल:
⦁ युरिया ब्रिकेट्स मशीन
⦁ युरिया ब्रिकेट्स अप्लिकेटर
⦁ ड्रोन
⦁ गोडाऊन बांधकाम
⦁ कोल्ड स्टोरेज
⦁ प्रक्रिया युनिट
⦁ मिनी भगर मिल
⦁ मिनी राईस मिल
⦁ ड्रीप ऑटोमायजेशन
अर्ज प्रक्रिया:
इच्छुक शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS)’ या तत्त्वावर लाभार्थी निवड केली जाणार आहे. अनुदानाचे प्रमाण व मर्यादा केंद्र व राज्य शासनाच्या विद्यमान मार्गदर्शक सूचनांनुसार राहील.
अधिक माहितीसाठी:
आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा आणि या योजनेचा लाभ घ्या.
जिल्हा कृषि अधिकारी, नंदुरबार श्री. सी. के. ठाकरे यांचे आवाहन:
‘शेतकऱ्यांनी कृषि समृद्धी योजनेतील विविध घटकांसाठी अर्ज करून उत्पादनक्षम, शाश्वत व प्रगत शेतीकडे वाटचाल करावी. ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीचा नवा अध्याय ठरेल.’
#कृषिसमृद्धी#नंदुरबारशेती#शेतकऱ्यांचाविकास#अन्नसुरक्षा#SustainableFarming#NandurbarAgriculture
















