
(नंदुरबार)
जिल्ह्यातील कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली कृषी क्लस्टर बैठक पार पडली. बैठकीत मत्स्यपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, पिक विविधता, आणि स्थानिक उत्पादन आधारित उपजीविका निर्मिती यासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय:
पुनरुज्जीवित तलाव – मत्स्यपालनासाठी वापर:
पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषद अखत्यारीतील तलावांचे पुनरुज्जीवन करून बचत गटांना मत्स्यपालनासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे ग्रामीण भागात शाश्वत उपजीविकेचे साधन निर्माण होणार आहे.
नवीन मत्स्यबीज केंद्र – देहली, ता. धडगाव:
मत्स्य व्यवसायास चालना देण्यासाठी देहली येथे नविन मत्स्यबीज केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
कुक्कुटपालन प्रकल्प:
बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून कुक्कुटपालन प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.
दुग्ध व्यवसायाचा विस्तार:
NDDB (राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ) येत्या काळात जिल्ह्यात येऊन दुग्ध व्यवसायाच्या संधींचा अभ्यास करणार आहे. यानुसार पुढील पावले उचलली जातील.
पिक विविधता व स्थानिक गूळ उत्पादन:
नवीन व बाजारपेठेला मागणी असणाऱ्या पिकांच्या प्रोत्साहनाबरोबर स्थानिक गूळ उत्पादनात शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यावर भर देण्यात आला.
कृषी संमेलन – ऑगस्ट अखेरीस:
शेतकरी, उत्पादक गट व कृषी तज्ज्ञांसाठी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस जिल्हा कृषी संमेलनाचे आयोजन होणार आहे.
मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेली ही बैठक जिल्ह्यातील कृषी विकासाला शाश्वततेची नवी दिशा देणारी ठरली आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीबरोबर स्वावलंबन व सामूहिक विकासासाठी प्रभावी रणनीती आखण्यात आली.

#KrushiClusterMeeting#drmittalisethi#nandurbaragriculture#sustainablelivelihoods#FisheriesDevelopment#dairyfarmingindia#poultryfarming#inspiredbydrmittalisethi#SmartRuralNandurbar















