तालुक्यातील मानमोडे येथे कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेतीदिन’ साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली क्रॉपसॅप अंतर्गत कापूस पिकाची शेतीशाळा घेण्यात आली. तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून कापूस पिकातील ‘दादा लाड तंत्रज्ञानाचे’ प्रात्यक्षिक राबविण्यात आले. या दोन्ही उपक्रमांची सांगता शेतीदिन साजरा करून करण्यात आली.
कार्यक्रमात मंडळ कृषी अधिकारी मनोज खैरनार यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी काशीराम वसावे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आवाहन करताना म्हटले की, ‘शेतीदिनानिमित्त कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी उत्पादनक्षम शेतीकडे वाटचाल करावी.’
कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ञ पद्माकर कुंदे यांनी दादा लाड तंत्रज्ञानाविषयी सखोल मार्गदर्शन केले. शेतीशाळेच्या संपर्क शेतकरी श्रीमती शीला पावरा, सदस्य ज्योती सोनवणे, तसेच प्रात्यक्षिक लाभार्थी चंद्रसिंग भील यांनी अनुभव व मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये:
तालुका कृषी अधिकारी श्री. काशीराम वसावे, कृषी विज्ञान केंद्राचे श्री. पद्माकर कुंदे, सरपंच श्री. देविदास पावरा, मंडळ कृषी अधिकारी श्री. मनोज खैरनार, उपकृषी अधिकारी श्री. एकनाथ सावळे, श्री. दुर्गाप्रसाद पाटील, श्री. संदीप कुवर, ‘नवजीवन शेतकरी गट’ चे सदस्य, ‘कापूस महिला शेतीशाळा’ चे सदस्य, माजी सरपंच श्री. उत्तम वसावे, पोलीस पाटील श्री. विनोद भामरे, श्री. बजरंग पारशी, श्री. लखा चमाऱ्या, श्री. चंद्रसिंग भील, सदस्य श्री. अर्जुन पावरा आदी मान्यवरांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कृषी अधिकारी श्री. अर्जुन पावरा यांनी केले, तर श्री. संदीप कुवर यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाचे ठळक मुद्दे:
क्रॉपसॅप अंतर्गत कापूस पिकाची शेतीशाळा
दादा लाड तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक
शेतकऱ्यांना योजनांबाबत मार्गदर्शन
महिला शेतीशाळा व शेतकरी गटांचा सहभाग
#शेतीदिन#नंदुरबारकृषिविभाग#कृषीविज्ञानकेंद्र#CropSAP#दादालाडतंत्रज्ञान#मानमोडे#शहादा#NandurbarAgriculture#FarmersFirst
















