सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने बंधारपाडा (ता. नंदुरबार) रोपवाटिका येथे आज वृक्ष उत्पादक आणि वृक्ष खरेदीदारांसाठी कृषी वानिकी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन…
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते रोपांच्या स्टॉलचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. तसेच “बेटी बचाओ, बेटी पढाओ” अभियानांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण, नाशिक) गजेंद्र हिरे होते.
उत्साहपूर्ण सुरुवात…
दीपप्रज्वलन व वृक्षपूजनाने मेळाव्याची सुरुवात झाली. विभागीय वनअधिकारी डॉ. मकरंद गुजर यांनी प्रास्ताविक करत कृषी वानिकीच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.
तज्ञांचे मार्गदर्शन…
बांबू उद्योगातील संधी
रमाकांत पाटील (बांबू बोर्ड सदस्य)
पेपर मील उद्योगातील संधी
संदीप घाटे (व्यवस्थापक, जे.के. पेपर मील, सोनगड)
बांबू लागवड, काढणी आणि विक्री प्रक्रिया
नंदलाल सोनवणे
बांबू उद्योगातील व्यवसाय संधी
प्रविण पाटील
सामाजिक वनीकरणाच्या विविध लाभदायी योजना
वनपरिक्षेत्र अधिकारी रामकृष्ण लामगे
कृषी वानिकीला चालना…
वनसंरक्षक गजेंद्र हिरे यांनी शेतकऱ्यांना कृषी वानिकी क्षेत्रात सक्रिय होण्याचे आवाहन केले. तसेच सामाजिक वनीकरणाच्या योजनांचा लाभ घेण्याच्या संधींबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन
या मेळाव्याचे मार्गदर्शन विभागीय वनअधिकारी (नंदुरबार) डॉ. मकरंद गुजर यांनी केले. यावेळी सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी, वन कर्मचारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

#कृषी_वानिकी#शेतकरी#वनसंवर्धन#वृक्षारोपण#सामाजिक_वनीकरण#बांबूउद्योग#पेपरमील#शाश्वतशेती#GreenMaharashtra#AgroForestry