Home नंदुरबार जिल्हा कोळदा येथे ‘कृषि नवदिशा परिषद’ संपन्न : कृषि क्षेत्रात करिअरच्या अपार संधी

कोळदा येथे ‘कृषि नवदिशा परिषद’ संपन्न : कृषि क्षेत्रात करिअरच्या अपार संधी

14
'Agriculture Navdisha Parishad' concluded in Kolda: Immense career opportunities in the agricultural sector

(नंदुरबार) डॉ. हेडगेवार सेवा समितीच्या कृषि विज्ञान केंद्रात सुरू असलेल्या १९व्या कृषि तंत्रज्ञान महोत्सवा अंतर्गत कोळदा येथे ‘कृषि नवदिशा परिषद’ आयोजित करण्यात आली.

कार्यक्रमात कृषि शिक्षण, करिअर संधी, तंत्रज्ञानाचा वापर आणि सायबर सुरक्षितता या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

मुख्य वक्ते म्हणून उपस्थित असलेल्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुहास वसावे यांनी कृषि क्षेत्रात करिअर घडविण्यास आज भरपूर संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. “मेहनत, कौशल्य आणि चिकाटी यांच्या जोरावर कृषि क्षेत्रात उच्च शिखरे गाठता येतात,” असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेशजी पाटील तर विशेष अतिथी म्हणून पवन पाटील, राहुल तडवी (सायबर सेल), जयंत उत्तरवार आणि पद्माकर कुंदे उपस्थित होते.

प्रास्ताविकात श्री. उत्तरवार यांनी महोत्सवातील उपक्रमांची माहिती दिली. श्री. कुंदे यांनी कृषि नवदिशा परिषदेचा उद्देश व विद्यार्थी-शेतकऱ्यांसाठी त्याची उपयुक्तता स्पष्ट केली.

सायबर सेलचे पवन पाटील व राहुल तडवी यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल सुरक्षितता, ऑनलाइन फसवणूक, APK फाईल्सचे धोके, व्यवहारातील सावधगिरी, ‘कवच’ ॲपची उपयुक्तता याबद्दल मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात सुरेशजी पाटील यांनी कृषि शिक्षण घेतलेल्या युवकांनी शेती क्षेत्रातही मोठे यश मिळवले असल्याची उदाहरणे देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

परिषदेस मुक्त विद्यापीठ व कोळदा ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने

उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन संदीप कुवर यांनी केले.

यावेळी मुक्त कृषि शिक्षण केंद्रातील यशस्वी शेतकरी ज्ञानेश्वर पाटील, तसेच सौ. कविता जोशी, सौ. वैशाली कुवर आणि कृषि उद्योजक अंकुश कालाणी यांचा सत्कार करण्यात आला.

#Nandurbar#KrishiNavdisha#AgriTech#AgricultureNews#KVKNandurbar#Farmers#AgriEducation#CyberSafety#YouthInAgriculture#DistrictNews