Home नंदुरबार जिल्हा धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्या दुचाकीस्वारावर अक्कलकुवा पोलिसांकडून गुन्हा दाखल

धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्या दुचाकीस्वारावर अक्कलकुवा पोलिसांकडून गुन्हा दाखल

0
Akkalkuva police register a case against a two-wheeler rider for performing dangerous stunts.

नंदुरबार(प्रतिनिधी):-9 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास अक्कलकुवा बसस्थानक परिसरात एका दुचाकीस्वाराकडून दुचाकीचे एक चाक वर करून धोकादायक पद्धतीने स्टंटबाजी केली जात असल्याची माहिती स्थानिक नागरिकाडून पोलिसांना प्राप्त झाली होती. सदर माहितीची गंभीर दखल घेत संबधित दुचाकीस्वाराचा शोध घेऊन त्याच्याविरूद्ध कायदेशीर करवाईची असल्याने अक्कलकुवा पोलिसांनी तपास व शोधकार्य सुरू केले असता 16 ऑगस्ट 2026 रोजी सदर स्टंटबाज नामे. नितेश गेदा वळवी, वय-23 वर्षे, रा. गंगापूर, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार याचा शोध घेण्यात आला. सदर इसमाने HERO Passion Pro दुचाकी क्र. GJ-17-AJ-7050 ही चालविताना एक चाक वर करून स्टंटबाजी करत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच सदर इसमाकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नसल्याचे आढळून आले.
सदर प्रकार हा सार्वजनिक व वर्दळीच्या ठिकाणी घडलयाने तेथे उपस्थित प्रवासी, पादचारी व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अक्कलकुवा पोलिस ठाणे गु.र.नं. 368/ 2026 अन्वये बी.एन.एस कलम 125, 281 सह मोटार वाहन कायदा कलम 184,3 (1) 181 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने पोलिस निरीक्षक अर्जुन पटले यांच्या मार्गदर्शनाखाली पोशि/309/दिनेश कोळी, पोशि/204/अमरसिंग पाडवी, पोशि/आकाश तिरकाडे व पोशि योगेश खेडकर यांनी केली. अक्कलकुवा पोलिसांकडून रस्ते अपघात आणि अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी विशेष लक्ष दिले जात असून धोकादायक वाहन चालक, स्टंटबाजी करणारे वाहनचालक तसेच वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध यापुढेही कठोर व सातत्यापूर्ण कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.