नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथकांतर्गत येणाऱ्या लघु पाटबंधारे योजना (ल.पा.यो.) चौपाळे, ता. व जि. नंदुरबार या प्रकल्पाच्या धरण क्षेत्रात व पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.
सद्यस्थितीत धरणाची पाणीपातळी ८९.८० मीटरवर पोहोचली असून, प्रकल्प ९५% क्षमतेने भरलेला आहे. यामुळे येत्या काही तासांत धरणाच्या सांडव्यावरून (spillway) पाण्याचा विसर्ग सुरु होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे प्रशासनाकडून चौपाळे प्रकल्पाच्या खालील प्रवाहातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या गावांमध्ये चौपाळे, उमर्दे, दहींदुले, कोलदा, खोडसगाव, देवळा, शेलू गावांचा समावेश आहे. तसेच इतर नदी/नाल्यांच्या काठावरील गावांनाही सजग राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महत्वाचे निर्देश:
•नदीपात्रात गुरेढोरे सोडू नयेत
•कोणीही नदीपात्रात जाऊ नये
•संभाव्य पुरस्थितीचा धोका लक्षात घेता नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी रहावे
•प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे
नंदुरबार जिल्हा प्रशासन, जलसंपदा विभाग, तसेच स्थानिक ग्रामपंचायती सजग असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
नागरिकांनी कोणतीही अफवा न पसरवता, अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा व आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षितता सुनिश्चित करावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
#चौपाळेधरण#नंदुरबार#धरणपाणीपातळी#सतर्कतेचाइशारा#पावसाचासतर्कता#आपत्कालीनसूचना#नदीपात्रसावधानता#महाराष्ट्रधरण#FloodAlert#DisasterManagement#NandurbarNews