Home नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांच्या अडचणी व तक्रारी मांडण्यासाठी प्रभावी...

नंदुरबार जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांच्या अडचणी व तक्रारी मांडण्यासाठी प्रभावी व सुरक्षित व्यासपीठ उपलब्ध व्हावे

0
An effective and safe platform should be provided to the problem-ridden and aggrieved women of Nandurbar district to air their problems and grievances.

हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा, या उद्देशाने शासन निर्णय क्र. मलोदि-२०१३/प्र.क्र.११/मकक दिनांक ४ मार्च २०१३ अन्वये दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो.

या उपक्रमांतर्गत जानेवारी महिन्यात महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ०१.०० वाजता करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रंगावली सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे संपन्न होणार आहे.

महिला लोकशाही दिनाच्या माध्यमातून महिलांच्या वैयक्तिक तक्रारी, अडचणी व समस्या संबंधित शासकीय यंत्रणेकडून तात्काळ ऐकून घेऊन त्यावर योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच महिलांना त्यांच्या हक्कांविषयी मार्गदर्शन देऊन न्याय मिळवून देण्यासाठी हा एक महत्त्वाचा आणि प्रभावी उपक्रम ठरत आहे.

तरी सर्व तक्रारदार महिलांनी आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ०१.०० वाजेपर्यंत स्वतः उपस्थित राहून आपला तक्रार अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्त्वाची सूचना:

सादर करण्यात येणारी तक्रार वैयक्तिक स्वरूपाची असावी.

न्यायप्रविष्ट, आस्थापना विषयक किंवा सामूहिक तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.

महिला लोकशाही दिन हा महिलांसाठी न्याय, सन्मान आणि अधिकार मिळवून देणारा एक विश्वासार्ह मंच असून, जास्तीत जास्त महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.