Home नंदुरबार “अन्नसंस्कृती” – नंदुरबारमधील लघुउद्योजकांसाठी नवे पाऊल! जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते...

“अन्नसंस्कृती” – नंदुरबारमधील लघुउद्योजकांसाठी नवे पाऊल! जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते विक्री केंद्राचे उद्घाटन

4
“Annasanskanti” – A new step for small entrepreneurs in Nandurbar! District Collector Dr. Mittali Sethi inaugurated the sales center

(नंदुरबार) डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कौन्सिल (NDDC) च्या संकल्पनेतून स्थानिक लघुउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या “अन्नसंस्कृती – स्थानिक खाद्यपदार्थ विक्री केंद्रा”चे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या शुभहस्ते गिरविहार गेट जवळील शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे संपन्न झाले.

या विक्री केंद्रामार्फत जिल्ह्यातील शहरी आणि दुर्गम भागातील लघुउद्योजकांनी तयार केलेले पारंपारिक व आरोग्यदायी खाद्यपदार्थ एकाच छताखाली उपलब्ध करून दिले जातील.

कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख राजेंद्र दहातोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी डॉ. गजानन डांगे, राष्ट्रीय अध्यक्ष – योजक, उपस्थित होते.

समन्वयक आशिष वाणी यांनी प्रास्ताविकातून या उपक्रमामागील उद्दिष्ट स्पष्ट केले. राजेंद्र दहातोंडे यांनी जिल्ह्यातील नवोन्मेषी लघुउद्योजकांचे काम अधोरेखित केले, तर नमन गोयल यांनी अशा उद्योजकांना कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे अधिक सक्षम करण्यावर भर दिला.

श्रवण दत्त यांनी सांगितले की, “आधुनिकतेच्या युगात पारंपारिक खाद्यसंस्कृती विसरली जात आहे, पण ‘अन्नसंस्कृती’सारखी उपक्रम नवीन पिढीला आपल्या मुळांशी जोडतील.”

उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी म्हणाल्या —

“भारतीय संस्कृतीनुसार अन्न हे केवळ पोषण नव्हे तर मूल्य आहे. ‘अन्नसंस्कृती’सारखे उपक्रम जगाला विकासाचा भारतीय पर्याय दाखवतात.”

समारोपात डॉ. गजानन डांगे यांनी “यथा अन्नः तथा मनः” या सूत्राद्वारे भारतीय अन्नसंस्काराचे मोल अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. प्रशांत बागुल यांनी केले. जिल्हाभरातील लघुउद्योजक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#Nandurbar#DistrictAdministration#DrMitaliSethi#NDDC#AnnSanskriti#LocalEntrepreneurs#FoodCulture#MakeInNandurbar#WomenEntrepreneurs#SkillDevelopment#TraditionalFood#SelfEmployment#GoodGovernance#TeamNandurbar#LocalToGlobal#AtmanirbharBharat#DigitalNandurbar