Home महाराष्ट्र जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी १५ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी १५ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

1
Appeal to apply by October 15 to participate in the District Level Youth Festival

मुंबई:  राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५-२६ अंतर्गत “विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” या विशेष उपक्रमाचे आयोजन १० ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२५ चे आयोजन २७ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. १५ ते २९ वर्षे वयोगटातील इच्छुक युवकांनी आपला स्पर्धेचा प्रवेश अर्ज १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत  सादर करावा, असे आवाहन मुंबई उपनगराच्या जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर यांनी केले आहे.

युवकांचा सर्वांगीण विकास साधणे, भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन करणे, तसेच युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे या उद्देशाने प्रतिवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. युवक कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय युवा  महोत्सवात कल्चरल ॲण्ड इनोव्हेशन ट्रॅक, विकसित भारत चॅलेंज ट्रॅक, डिझाइन फॉर भारत, हॅक फॉर सोशल कॉज (CULTURAL AND INNOVATION TRACK, VIKSIT BHARAT CHALLENGE TRACK, DESIGN FOR BHARAT, HACK FOR SOCIAL CAUSE) या विषयांवर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात  येणार आहे.

महोत्सवात वक्तृत्व स्पर्धा, कथा लेखन, चित्रकला, लोकनृत्य, लोकगीत, कविता लेखन, विज्ञान प्रदर्शन, नवोपक्रम आदी प्रकारांचा समावेश आहे. १५ ते २९ वर्षे वयोगटातील इच्छुक युवकांनी आपला स्पर्धेचा प्रवेश अर्ज १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत  https://forms.gle/1zQLPeMJ1zFQW6Za6 या गुगल फॉर्मद्वारे सादर करावा. स्पर्धेबाबतची सविस्तर माहिती www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धा प्रमुख ऋचा आळवेकर (मो. ७६६६४६७४३०) किंवा आशुतोष पांडे – युवा पुरस्कार्थी (मो. ९८१९२४०६२९) यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती रश्मी आंबेडकर यांनी कळविले आहे.