
(तळोदा)तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरजू नागरिकांसाठी घरकुल लाभासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. सदर योजना ही ग्रामीण भागातील गरीब व बेघर कुटुंबांना पक्के घरे मिळावीत या हेतूने केंद्र सरकारकडून राबवण्यात येत आहे.
गृहप्रकल्पासाठी पात्र लाभार्थ्यांनी काही अर्ज ग्रामपंचायत कार्यालयामार्फत ऑफलाईन पद्धतीने भरावेत, तर काही अर्ज ऑनलाईन पोर्टलद्वारे (www.awas.in, www.nrega.in) सुद्धा सादर करता येतात. त्यामुळे नागरिकांनी अर्ज प्रक्रिया योग्य प्रकारे समजून घ्यावी आणि कोणत्याही मध्यस्थाची मदत न घेता अधिकृत मार्गांनीच अर्ज करावा, असे आवाहन पंचायत समिती तळोदा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत घरकुल मंजुरीसाठी लाभार्थ्याच्या नावावर जमीन असणे, सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणात समावेश असणे, तसेच पात्रतेच्या इतर अटींचे पालन आवश्यक आहे. शासनाच्या RTI (माहितीचा अधिकार कायदा) आणि RTS (सेवांचा हक्क कायदा) अंतर्गत नागरिकांना वेळेत व पारदर्शक सेवा मिळाव्यात, यासाठी पंचायत समिती तळोदा विशेष प्रयत्नशील आहे.
ऑनलाईन अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळे वापरावीत:
#PMAY#AwasYojana#TalodaPanchayatSamiti#RTI#RTS#घरकुलयोजना#DigitalSeva#TransparentGovernance