
(नंदुरबार) शासनाच्या पर्यावरण विभागाने (SEIAA) पर्यावरणाच्या दृष्टिकोनातुन 8 एप्रिल 2025 रोजीच्या पत्रानुसार वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबारसाठी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमता व 500 खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकामास मान्यता दिली आहे. या मान्यता पत्राची प्रत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयामध्ये तसेच पर्यावरण विभागाच्या, http://parivesh.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
0000000000