
नंदुरबार,
तालुका नंदुरबार अंतर्गत मौजा काकर्डे, वडवद व शिंदगव्हाण गावांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत जनजागृती व प्रचारप्रसार कार्यक्रम पार पडला. यामध्ये शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळवण्यासाठी पीक विमा काढण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
कार्यक्रमात सहाय्यक कृषी अधिकारी श्री. मंदार पाटील, श्री. दीपक राजपूत आणि उप कृषी अधिकारी श्री. करणसिंग गिरासे यांनी शेतकऱ्यांना योजना, लाभ व अर्ज प्रक्रिया याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. गावातील अनेक शेतकरी या उपक्रमात सहभागी झाले.
पीक विमा योजनेची वैशिष्ट्ये:
व्यापक संरक्षण:
⦁ पूर, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, भूस्खलन, कीड, रोग आदी नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीसाठी संरक्षण.
⦁ पेरणी न झाल्यासही विमा संरक्षण उपलब्ध.
⦁ काढणीनंतर १४ दिवसांपर्यंत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी संरक्षण.
⦁ स्थानिक नैसर्गिक आपत्तींमुळे (ढगफुटी, जलमयता, गारपीट) होणाऱ्या नुकसानीसाठी वैयक्तिक पातळीवर मदत.
⦁ कर्जदार आणि बिगर-कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक योजना.
तंत्रज्ञानाचा वापर:
उपग्रह प्रतिमा, ड्रोन, स्मार्टफोनद्वारे नुकसानीचे अचूक मूल्यांकन.
उद्दिष्टे:
⦁ शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणे.
⦁ उत्पन्नात अनिश्चिततेवर नियंत्रण.
⦁ आधुनिक कृषी पद्धतींचा अवलंबास प्रोत्साहन.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना तत्काळ कृषी विभागाच्या सहाय्याने अर्ज सादर करण्याचे आवाहन केले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये पीक विमा योजनेबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण झाली आहे.
#प्रधानमंत्रीपीकविमा#NandurbarAgriculture#PMFBY#डिजिटलशेती#AgriAwareness#NandurbarNews















