जनजागृती कार्यक्रम – चाईल्ड हेल्पलाईन १०९८, नंदुरबार
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत कार्यरत चाईल्ड हेल्पलाईन १०९८ नंदुरबार मार्फत पो. वसलाई (ता. नंदुरबार) येथे बालकांच्या संरक्षणासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात दिलेली महत्वपूर्ण माहितीः
बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६
बालकामगार बंदी व पुनर्वसन
सापडलेल्या व बेवारस बालकांचे संरक्षण
बाल संगोपन व दत्तक प्रक्रिया
काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी योजना
प्रकल्प समन्वयक श्रीमती सपना नगराळे यांनी बालविवाहाचे कायदेशीर परिणाम स्पष्ट करत ग्रामविकास अधिकारी यांची जबाबदारी अधोरेखित केली.
सरपंच कुवरसिंग वळवी, ग्रामपंचायत सदस्य, श्री. पंकज पिंपळे (ग्रामविकास अधिकारी), अंगणवाडी सेविका व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित!
बालहक्क, सुरक्षितता आणि सशक्त समाजासाठी आपली भूमिका महत्वाची आहे.
कुठल्याही संकटात बालकांसाठी चाईल्ड हेल्पलाईन १०९८ ही विनामूल्य सेवा तत्पर आहे!

#ChildRights#SayNoToChildMarriage#ChildHelpline1098#WCDNandurbar#BalSangopan#StopChildLabour#Nandurbar#ChildProtection#बालहक्क#1098Helpline
















