(नंदुरबार) राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत मौजे कडवान, ता. नवापूर, जि. नंदुरबार येथे शेतकरी जनजागृती व ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात नैसर्गिक शेतीचे फायदे, शाश्वत उत्पादनासाठी जैविक घटकांचा उपयोग आणि शेतकऱ्यांची प्रत्यक्ष सहभाग वाढवण्यासाठी विविध मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रकल्प संचालक आत्मा, मा. श्री. दीपक पटेल, तसेच तालुका कृषी अधिकारी श्री. रविशंकर पाडवी, मंडळ कृषी अधिकारी श्री. डी. एस. तावडे, उप कृषी अधिकारी श्री. प्रशांत पाटील व श्री. प्रमोद पाटील, आणि सहायक कृषी अधिकारी कुंदन वसावे व आकाश वसावे उपस्थित होते. मंडळातील सर्व कृषी सखी व सहायक कृषी अधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी ह्युमिक अॅसिड तयार करण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. शेतकऱ्यांना नैसर्गिक घटकांचा वापर करून खत उत्पादनाचे तंत्र प्रत्यक्ष दाखवण्यात आले. यामुळे रासायनिक खतांवरील अवलंबन कमी होऊन जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होईल.
कार्यक्रमामध्ये कृषी सखी यांना सुचना देण्यात आल्या की, त्या शेतकऱ्यांच्या शेतीला नियमित भेटी देऊन निविष्ठा तयार करावी, त्याचा वापर व्हावा यासाठी सक्रिय पाठपुरावा करावा.
हा उपक्रम शाश्वत, आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक शेतीकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.

#NashargikSheti#NaturalFarmingMission#ATMA#Kaduvan#Nandurbar#AgriAwareness#HumicAcidDemo#KrushiSakhi