(नंदुरबार) डिजिटल युगात सुरक्षित इंटरनेट वापराचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी 10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता नंदुरबार येथे सुरक्षित इंटरनेट दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यशाळेस विविध विभाग प्रमुख तसेच त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली रंगवली सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत इंटरनेटचा जबाबदारीने व सुरक्षित पद्धतीने वापर करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. डिजिटल माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता सायबर सुरक्षेचे महत्त्व, ऑनलाईन फसवणूक टाळण्याचे उपाय, डेटा सुरक्षितता तसेच शासकीय कामकाजात सुरक्षित डिजिटल प्रणालीचा वापर याबाबत माहिती देण्यात आली.
कार्यशाळेदरम्यान इंटरनेटचा वापर करताना घ्यावयाची काळजी, मजबूत पासवर्ड तयार करण्याची पद्धत, संशयास्पद लिंक किंवा संदेशांपासून सावध राहण्याचे मार्ग तसेच अधिकृत संकेतस्थळांचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी सतर्कता व जागरूकता हीच प्रभावी उपाययोजना असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शासकीय विभागांमध्ये डिजिटल प्रणालीचा वापर वाढत असताना माहितीची गोपनीयता व सुरक्षितता राखणे अत्यंत आवश्यक असून प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी सुरक्षित इंटरनेट वापराची जबाबदारी पार पाडावी, असा संदेश कार्यशाळेतून देण्यात आला.
या उपक्रमामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सायबर सुरक्षा विषयक जागरूकता वाढण्यास मदत होऊन शासकीय कामकाज अधिक सुरक्षित व कार्यक्षम होण्यास चालना मिळणार आहे..
#SafeInternetDay#CyberSecurity#DigitalAwareness#SafeBrowsing#Nandurbar#DigitalIndia#CyberSafety#GovernmentInitiative#SecureInternet#ITAwareness
















