
नटावद ग्रामीण रुग्णालयासाठी हिमालया बेबी प्रॉडक्ट्स या उद्योगसमूहाने उद्योगांची सामाजिक जबाबदारी (CSR) अंतर्गत रुग्णालयात सर्व सोयी-सुविधांनी युक्त ‘बेबी फीडिंग रूम’ उपलब्ध करून दिली. या उपक्रमामुळे नव्या मातांसाठी सुरक्षित, स्वच्छ, सन्मानजनक व गोपनीयतेसह स्तनपानाची सुविधा निर्माण झाली आहे.
नवीन बेबी फीडिंग रूमचे उद्घाटन मा. ACS डॉ. नरेशजी पाडवी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या उपक्रमासाठी मार्गदर्शन मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनयजी सोनवणे यांनी केले.
कार्यक्रमाला डॉ. प्रज्ञा वळवी – MS, नटावद ग्रामीण रुग्णालय, डॉ. राहुल कोकणी, प्रवीणकुमार पाटील, डॉ. सागर पाटील – समाजसेवा अधीक्षक, जिल्हा रुग्णालय नंदुरबार मान्यवर उपस्थित होते:
हिमालया कंपनीकडून पुरविण्यात आलेल्या या कक्षामध्ये खालील सुविधा उपलब्ध आहेत:
स्वच्छ व शांत वातावरण
स्तनपान करणाऱ्या मातांसाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि स्वच्छ जागा
आरामदायी बसण्याची व्यवस्था
बेबी केअर हायजीन साहित्य
सुरक्षितता व गोपनीयतेची विशेष काळजी
ही नवीन सोय उपलब्ध झाल्यामुळे ग्रामीण भागातील मातांना उपचारासाठी किंवा आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात येताना आता बाळांना सुरक्षितपणे स्तनपान करण्याची सुविधा मिळणार आहे. सार्वजनिक ठिकाणी स्तनपान कक्षांची वाढती गरज लक्षात घेता हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
नटावद ग्रामीण रुग्णालय, जिल्हा प्रशासन आणि CSR उपक्रमांच्या माध्यमातून करण्यात आलेली ही सुविधा महिला आणि बालआरोग्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
#Nandurbar#CSR#Himalaya#BabyFeedingRoom#WomenHealth#ChildCare#RuralHealthcare#NandurbarDistrict#HealthInitiative















