Home तळोदा तळोदा तालुक्यातील मोड ते खेडले रस्त्याची दुरावस्था : रस्ता दुरुस्तीची मागणी

तळोदा तालुक्यातील मोड ते खेडले रस्त्याची दुरावस्था : रस्ता दुरुस्तीची मागणी

27
taloda
taloda

(तळोदा) तळोदा तालुक्यातील मोड ते खेडले रस्त्याची दुरवस्था झाल्याने मोड, खेडलेसह मोड-पुनर्वसन येथील ग्रामस्थांना सुद्धा अनेक समस्यांना तोंड देत प्रवास करावा लागत आहे. (Nandurbar News)

मोड-खेडले परिसर जलमय

मागील चार वर्षावर माहे ऑगस्ट ते ऑक्टोबर 2019 मध्ये सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीसदृश परिस्थितीमुळे निझरी नदी ओसंडून वहात होती. त्यामुळे मोड-खेडले परिसर जलमय झाले होते. नदीच्या पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की पात्रातील पाणी रस्त्यावरून वहात असल्याने संपुर्ण रस्त्याची चाळण झाल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. चार चाकीसह दुचाकी वाहन देखील चालवणे जिकरीचे झाले आहे. डिसेंबर 2022 मध्ये 1800 मीटर रस्त्याचे काम करण्यात आले आहे. परंतू अद्याप अर्धा रस्ता दुरुस्ती विना रखडला आहे.

तत्काळ रस्ता दुरुस्तीची मागणी

ऑक्टोंबर 2019 च्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे निझरी नदीला जोरदार पूर आला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांसह जमिनीवरील माती देखील वाहुन गेली आहे. सदरील माती ही मोड-खेडलेच्या मुख्य रस्त्यावर जमा झाल्याने सदरील रस्ता हा पूर्णपणे उन्हाळ्यात धुळयुक्त व खड्डेयुक्त होत असतो. त्यामुळे रस्त्यावर मोठया प्रमाणावर धूळ साचून प्रवासी जायबंद होताना दिसत होते. तीच परिस्थिती पावसाळ्यात सुध्दा तयार झाली आहे. रस्त्या प्रचंड खराब झाल्याने शेतातील उत्पन्न काढण्यासाठी सुद्धा मोठी अडचण निर्माण होत आहे. तसेच ह्याच रस्त्या शेजारी प्रशासनाने पुनर्वसन बाधीतांचे पुनर्वसनाची सोय केली आहे. परंतु त्यांना दैनंदिन गरजा पुर्ण करण्यासाठी प्रकाशा, नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे जिकरीचे झाले आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेल्या रस्त्यावरुन प्रवास करावा लागत असल्याने सदरील ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर तरी तत्काळ रस्त्या दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.